नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याची शनिवारी(ता.२२) सांगता झाली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तुम्ही अमित ठाकरे यांच्या लग्नाचे निमंत्रण नरेंद्र मोदींना देणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर मोदींचा लग्न या गोष्टीवर विश्वास आहे का असा मिश्किल टोला राज ठाकरे यांनी लगावल्याने उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला. अमित ठाकरे यांचे येत्या २७ जानेवारीला लग्न आहे. सगळ्यांनाच बोलवायचे झाले तर तो आकडा ६ लाखांवर जातो, त्यामुळे अमित यांच्या विवाह सोहळ्याला मर्यादीत लोकांनाच बोलावणार आहोत असेही ठाकरे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या पाच दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज या
दौऱ्याची सांगता झाली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर
टिकेची झोड उठवली. राज्यातील दुष्काळाचा प्रश्न, देशातील सध्याची स्थिती यावर देखील
त्यांनी भाष्य केले. अमित ठाकरे यांच्या लग्न सोहळ्याला सगळ्यांनाच बोलावायचे म्हटले
तर तो आकडा ६ लाखांवर जातो. त्यामुळे दिलगीरी व्यक्त करतो पण सगळ्यांनाच बोलावणे शक्य
नसून मर्यादीत लोकांनाच निमंत्रण देणार आहे असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले.